ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार राहणीमानाच्या दृष्टीनं दिल्ली हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
अर्थव्यवस्था, राहणीमान, पर्यावरण, प्रशासन आणि तत्सम निकषांच्या आधारे या यादीत दुसरं स्थान मिळालं आहे बंगळुरूला.
यादीत तिसरं स्थान आहे ते म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीचं अर्थात मुंबईचं.
दक्षिणेकडील चेन्नई हे शहर या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
राहणीमान, अर्थव्यवस्था आणि तत्सम निकषांच्या आधारे यादीत पाचवं स्थान मिळालं आहे कोची या शहराला.
यादीत सहाव्या स्थानी आहे, कोलकाता.
महाराष्ट्रातील पुणे हे शहर राहणीमानाच्या या यादीत सातव्या स्थानी आहे.
आठवं स्थान मिळालं आहे, थ्रिसूर या शहराला.
अर्थव्यवस्था, मनुष्यबळ या निकषांच्या आधारे असणाऱ्या यादीत नवव्या स्थानी आहे हैदराबाद.
या यादीत दहावं स्थान मिळवणारं शहर आहे सुलतानपूर.