सरकारी पदावर असलेल्या आणि सर्वाधिक पगार घेणाऱ्या टॉप पाच व्यक्ती कोण हे पाहूयात...
सर्व सरकारी पदावरील व्यक्तींचा विचार केल्यास भारताच्या राष्ट्रपतींना सर्वाधिक पगार मिळतो.
भारताच्या राष्ट्रपतींना महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळतो. तसेच अतिरिक्त भत्तेही दिले जातात.
पगाराबरोबरच राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवन, सरकारी गाड्या, मदतनीस आणि 24 तास सुरक्षा अशा सेवाही सरकारकडून मिळतात.
सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांमध्ये उपराष्ट्रपतींचा दुसरा क्रमांक लागतो. त्यांना महिना 4 लाख रुपये पगार मिळतो.
उपराष्ट्रपतींखालोखाल सर्वाधिक पगार असलेलं सरकारी पद म्हणजे राज्यपाल! राज्यपालांना महिना साडेतीन लाख रुपये पगार अन् राष्ट्रपतींप्रमाणे इतर सेवा मिळतात.
सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांमध्ये सरन्यायाधीश चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना महिना 2 लाख 80 हजार रुपये मिळतात.
पंतप्रधानांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि सरन्यायाधीशांपेक्षा कमी वेतन मिळतं.
पंतप्रधानांना दर महिना 1 लाख 66 हजार रुपये वेतन दिलं जातं. तसेच या व्यतिरिक्त अतिरिक्त भत्तेही पंतप्रधानांना मिळतात.
पंतप्रधानांना सरकारी निवासस्थान, विशेष सुरक्षा, विशेष विमान, बुलेट प्रूफ वाहनं दिली जातात.