राष्ट्रपती कि पंतप्रधान कोणाला मिळतो सर्वात जास्त पगार?

सर्वाधिक पगार घेणाऱ्या सरकारी पदावरील व्यक्तींची यादी

सरकारी पदावर असलेल्या आणि सर्वाधिक पगार घेणाऱ्या टॉप पाच व्यक्ती कोण हे पाहूयात...

राष्ट्रपतींना सर्वाधिक पगार

सर्व सरकारी पदावरील व्यक्तींचा विचार केल्यास भारताच्या राष्ट्रपतींना सर्वाधिक पगार मिळतो.

राष्ट्रपतींचा पगार किती?

भारताच्या राष्ट्रपतींना महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळतो. तसेच अतिरिक्त भत्तेही दिले जातात.

राष्ट्रपतींना या सेवाही मिळतात

पगाराबरोबरच राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवन, सरकारी गाड्या, मदतनीस आणि 24 तास सुरक्षा अशा सेवाही सरकारकडून मिळतात.

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांमध्ये उपराष्ट्रपतींचा दुसरा क्रमांक लागतो. त्यांना महिना 4 लाख रुपये पगार मिळतो.

राज्यपाल तिसऱ्या स्थानी

उपराष्ट्रपतींखालोखाल सर्वाधिक पगार असलेलं सरकारी पद म्हणजे राज्यपाल! राज्यपालांना महिना साडेतीन लाख रुपये पगार अन् राष्ट्रपतींप्रमाणे इतर सेवा मिळतात.

सरन्यायाधीशही टॉप फोरमध्ये

सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांमध्ये सरन्यायाधीश चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना महिना 2 लाख 80 हजार रुपये मिळतात.

या चौघांपेक्षा पंतप्रधानांना कमी पगार

पंतप्रधानांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि सरन्यायाधीशांपेक्षा कमी वेतन मिळतं.

पंतप्रधानांचा पगार किती?

पंतप्रधानांना दर महिना 1 लाख 66 हजार रुपये वेतन दिलं जातं. तसेच या व्यतिरिक्त अतिरिक्त भत्तेही पंतप्रधानांना मिळतात.

पंतप्रधानांना या सुविधाही मिळतात

पंतप्रधानांना सरकारी निवासस्थान, विशेष सुरक्षा, विशेष विमान, बुलेट प्रूफ वाहनं दिली जातात.

VIEW ALL

Read Next Story