Yoga For Mental Health: दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिवस सुरु आहेत. बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्यानंतर दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. शालेय वयात असताना मुले परीक्षांचा खूप ताण घेतात. अनेक मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. घरच्या घरी योगा करुन तुम्ही परीक्षेचा ताण घालवू शकता.
पद्मासन योगमुळे रक्त प्रवास सुरळीत राहतो. मान आणि मणक्याचे हाड मजबूत होते. मांड्या आणि पोटाची चरबी कमी होते. तसेच तणावदेखील दूर होतो.
पादहस्तासनमुळे मासंपेशींची मालिश होते. पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. अपचन, बद्धकोष्टता, स्थूलपणा असेल तर दिलासा मिळतो. याने मुलांची उंचीदेखील वाढते.
यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धी तीक्ष्ण होते. शरीरात उर्जा वाढते. विचार करण्याची क्षमता वाढते. निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
पश्चिमोत्तनासन केल्याने शरीराचा संपूर्ण भाग ताणला जातो आणि ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाची समस्येवर हा रामबाण उपाय आहे. विद्यार्थीदेखील हा योगाभ्यास करु शकतात.
हा योगदेखील सुपर ब्रेन योगच्या श्रेणीत येतो. लहान मुले आणि वयस्कर दोघांनाही याचा फायदा होतो. यामुळे तुमची एकाग्रता वाढते. रचनात्मक कौशल्य वाढते.
शिरशासनामुळे तणाव आणि चिंता दूर होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन क्रिया सुधारते. तसेच हार्मोन्स संतुलित होतात. यामुळे रक्ताभिसरण, श्वसन कार्यदेखील सुधारते.
काकासन योगला क्रो पोझ किंवा बकासन असं म्हटलं जातं. यामुळे मांसपेशी ताकदवान बनतात. हे करताना शरिरात संतुलन राखावे लागते. यामुळे तुमची पाठ, बायसेप्स आणि ट्रायसेप्ससोबत शरिराच्या मांसपेशी स्ट्रेचिंग होते.