भारतात असणारं हे गाव एकदोन नव्हे तब्बल 14 लहान बेटांपासून तयार झालं असून, खुद्द उद्योगपती, व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनाही या गावानं भुरळ घातली आहे.
पाण्यावर तरंगणारं हे गाव पाहताना आपण निसर्गानं सादर केलेला जादूचा प्रयोग पाहत आहोत की काय अशीच अनुभूती होत राहते.
kadamakkudy islands किंवा कडमक्कुडी असं या गावाचं नाव असून ते केरळमध्ये आहे. नैसर्गिक सौंदर्य, बॅकवॉटर्स आणि येथील हिरवळ इथं येणाऱ्यांच्या मनाता ठाव घेते.
कडमक्कुडी हे गाव, वालिया कदमाकुडी, मुरीक्कल, पालयम थुरूथ, पिझाला, चेरिया कदमकुडी, पुलिक्कापूरम, मूलमपिल्ली, पुथुस्सेरी, चारियम थुरुथ, चेन्नूर, कोठाड, कोरमबादम, कंदनाड आणि करिक्कड थुरूथू या बेटांपासून तयार झालं आहे.
हे गाव एर्नाकुलम जिल्ह्यात येतं आणि त्यापासूनचं जवळचं शहर आहे कोच्ची. अरबी समुद्रापासून निघालेल्या बॅकवॉटर क्षेत्रात हे गाव येतं.
या गावातील नागरिकांची उपजिविका शेती आणि मत्स्योत्पादनाव अवलंबून आहे. गेल्या काही काळापासून पर्यटकांचा ओघही या गावाकडे वाढत आहे. या गावात नागरिक मुख्य वाहन म्हणन लहान बोटींचा वापर करतात.
इथं कोच्चीहून कार, ऑटोनं या गावात पोहोचता येतं. इथं पोहोचण्यासाठी रस्तेमार्ग किंवा जलमार्गाचा सहज अवलंब करता येतो.