'हे' आहे भारतातील मिनी इस्रायल... एका नक्की भेट द्या

पर्यटनस्थळं

भारतामध्ये एकाहून एक सरस अशी पर्यटनस्थळं आहेत. अशा या भारतातील काही ठिकाणं मात्र परदेशी पर्यटकांच्या विशेष आवडीची.

पर्यटनाचा विकास

पर्यटनाचा विकास पाहता मागील काही वर्षांमध्ये मूळ प्रकाशझोतात नसलेली अनेक ठिकाणंही आकर्णाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली आहेत.

निसर्गसौंदर्य

देशातील एक असंच कमाल ठिकाण सध्या तेथील निसर्गसौंदर्यानं इथं येणाऱ्या प्रत्येकालाच भारावत असून, त्याची आणखी एक ओळख म्हणजे भारतातील मिनी इस्रायल.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशात असणाऱ्या या ठिकाणाचं नाव आहे, धरमकोट. यहूदींची इथं मोठ्या संख्येनं हजेरी असते, ज्यामुळं या ठिकाणाला मिनी इस्रायल असंही म्हणतात.

भटकंती

इस्रायलमधील नागरिकांची इथं भटकंतीसाठी येण्यास विशेष पसंती. हल्ली भारतीयसुद्धा या ठिकाणाला भेट द्यायला पसंती देतात.

खाद्यसंस्कृती

परिणामी येथील कॅफे, खाद्यसंस्कृती आणि खरेदीच्या ठिकाणांवरही याच देशाचा अधिक पगडा पाहायला मिळतो.

VIEW ALL

Read Next Story