ढगांवर तरंगणारं टुमदार गाव; महाराष्ट्रापासून थोडं दूर, पण प्रवास पैसा वसूल!!!

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

भटकंती

नोव्हेंबर महिन्यामध्ये सहसा अनेक मंडळी भटकंतीसाठी निघण्याचा बेत आखतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ठिकाण निवडण्याची प्रक्रिया कमाल असते.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

नवी ठिकाणं

काहींना इथं नवी ठिकाणं पाहण्याचा मोह असतो. अशा सर्वांसाठीच 'हे' चौकटीबाहेरचं एक ठिकाण उत्तम पर्याय ठरु शकतं.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

झिरो व्हॅली

महाराष्ट्रापासून दूर असणारं हे टुमदार गाव, हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात असून, त्याचं नाव आहे 'झिरो व्हॅली' (ziro valley). हे एक सुरेख गिरीस्थान असून इथं गर्दीसुद्धा तुलनेनं कमीच.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

निसर्ग

निसर्गाच्या अवाक् करणाऱ्या लीला इथं येऊन पाहता येतात. त्यामुळं इथं पावलोपावली निसर्ग थक्क करतो असं म्हणणं गैर ठरणार नाही.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

बर्फाच्छादित पर्वत

हिरवेगार डोंगर, दूरवर दिसणारे बर्फाच्छादित पर्वत, घनदाट वनराई आणि बहरलेली शेती पाहताना हे गाव एखाद्या चित्राप्रमाणं भासतं.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

खोऱ्यातील गाव

चहूबाजुंबी बर्फानं अच्छादलेले पर्वत आणि मधोमध असणारं हे खोऱ्यातील गाव पाहताना इथून कधीच माघारी जाऊ नये असं अनेकांना वाटतं.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

उत्तम पर्याय

नोव्हेंबरमध्ये भटकंतीला जाण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय. जिथं, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, ट्रेल वॉकचाही अनुभव घेता येतो.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

एकदातरी भेट द्या

कुटुंब किंवा मित्रमंडळींसमवेत जाण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय असून, साचेबद्ध ठिकाणांना शह देत एकदातरी भेट द्या या 'झिरो व्हॅली'ला.

Published by: Sayali Patil | Oct 30, 2025

VIEW ALL

Read Next Story