फाशी दिवसाच का दिली जाते, शेवटच्या क्षणी जल्लाद कैद्याच्या कानात काय बोलतो?
भारतीय न्याय संहितेत काही गुन्हांसाठी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतुद आहे. भारतात कैद्याला फाशी केवळ दिवसा दिली जाते.
कैद्याला फाशी देण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. सकाळी 6,7 किंवा 8 वाजता, पण ही वेळ दिवसाचीच असते.
याचं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे एखाद्या कैद्याला फाशी दिली जाते, त्यावेळी इतर कैदी झोपलेले असतात.
शिवाय ज्या कैदाला फाशी देतात त्याला पूर्ण दिवसाची वाट पाहावी लागू नये. तसंच कैद्याच्या कुटुंबियांना अंतिम संस्काराची संधी मिळावी.
कैद्याच्या कुटुंबियांना 10 ते 15 दिवस आधी याबाबत कळवलं जातं. कारण शेवटच्या दिवसात कुटुंबियांना कैद्याला भेटायला मिळावं.
फाशी देण्याआधी कैद्याला आंघोळ घातली जाते, तसंच त्याला नवे कपडे घालायला देतात. फाशी देण्याआधी कैद्याला अंतिम इच्छाही विचारली जाते.
फाशी देण्याआधी जल्लाद कैद्याच्या कानात काहीतरी बोलतो, त्यानंतर कैद्याला फासावर लटकावतो.
कैदी हिंदू असेल तर जल्लाद त्याच्या कानात राम आणि मुस्लिम असेल तर त्याच्या कानात सलाम म्हणतो. पुढच्या जन्मात तू सत्याच्या वाटेवर चालवं अशी प्रार्थना करतो असं जल्लाद म्हणतो.