भारतासाठी धोक्याची घंटा

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात भूजल पातळी कमी होण्याच्या मार्गावर आहे.

येत्या काही वर्षात वाढणार चिंता

त्यामुळे येत्या काही वर्षांत देशात भूजलाचा तुटवडा जाणवू शकतो, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

कोणी तयार केलाय अहवाल?

हा अहवाल संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण आणि मानवी सुरक्षा संस्थेने (UNU-EHS) जारी केला आहे.

पंजाबमधील स्थिती बिकट

'इंटरकनेक्टेड डिझास्टर रिस्क रिपोर्ट 2023' नावाच्या या अहवालानुसार पंजाबमधील 78 टक्के विहिरींची स्थिती बिघडली आहे.

2025 पर्यंत तीव्र टंचाई

संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रदेशाला 2025 पर्यंत भूजलाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागू शकतो. भारताच्या उत्तर-पश्चिम भागात राजस्थान, पंजाब आणि हरियाणा सारखी राज्ये आहेत.

भारतासह इतर देशांनाही धोका

अहवालानुसार इतर देशांनाही भूजल टंचाईचा सामना करावा लागत आहे. यानुसार सौदी अरेबियाने भूजल धोक्याचा टप्पा ओलांडला आहे.

अन्न उत्पादन प्रणालीला धोका

अहवालानुसार, पाण्याची पातळी अशीच घसरत राहिल्यास शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे बंद होईल. यामुळे जगातील अन्न उत्पादन प्रणाली धोक्यात येऊ शकते.

आणखी कोणतं संकटं येणार?

यामुळे पृथ्वीवरून जीव नष्ट होण्याचा वेग वाढू शकतो, भूजल पातळी वेगाने खाली येऊ शकते आणि हिमनद्या वेगाने वितळू शकतात.

VIEW ALL

Read Next Story