इंटरनेट नसलं तरी होईल UPI पेमेंट, पद्धत खूपच सोपी!

Pravin Dabholkar
Jun 14,2025


इंटरनेटमुळे तुम्ही तिकिट बुकींगपासून शॉपिंगपर्यंत सर्वकाही घरबसल्या करु शकता.


गेल्या काही वर्षात यूपीआय व्यवहार वाढलेयत. एनपीसीआयने 2016 साली ही सेवा सुरु केली. ज्यामुळे पेमेंटची परिभाषाच बदलली.


यामुळे पैसे ट्रान्स्फर करणे, ऑनलाईन पेमेंट करणे सोपं झालंय. पण इंटरनेटच नसेल तर काय करायचं?


यूपीआय तुम्हाला ऑफलाइन पेमेंटची सेवा देतं. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.


सर्वात आधी आपलं अकाऊंट सेटअप करा. यासाठी *99# डायल करा. यानंतर भाषा निवडा.


येथे तुम्हाला 13 भाषांचा एक्सेस मिळेल. IFSC कोड एंटर करा. बॅंक अकाऊंट नंबर निवडा.


डेबिट कार्डचे शेवटचे 4 नंबर एंटर करा. यूपीआय नंबर रजिस्टर होईल. यानंतर *99# डायल करुन यूपीआय पेमेंट करा.


सेंड मनी पर्याय निवडा. मग दुसऱ्या यूजर्सची माहिती एंटर करा. अमाऊंट भरा आणि यूपीआय पिन कन्फर्म करा.

VIEW ALL

Read Next Story