उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

Jul 02,2024


या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. याशिवाय शेकडो लोकं जखमी झाले आहेत.


ही दुर्घटना नारायण साकार हरि उर्फ साकार विश्र हरि उर्फ भोले बाबा याच्या सत्संग कार्यक्रमात झाली. त्याच्या प्रवचनाला मोठी गर्दी झाली होती.


भोले बाबा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात झाला. भोले बाबा स्वत:ला इंटेजलिजेंस ब्यूरोचा माजी कर्मचारी असल्याचं सांगतो.


भोले बाबाने 26 वर्षांपूर्वी सरकारी नोकरी सोडली आणि त्यानंतर तो धार्मिक प्रवचन करायला लागला. पश्चिम, उत्तर युपीसह उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत त्याचे लाखो अनुयायी आहेत.


भोले बाबा सोशल मीडियापासून दूर राहातो. इतर कथावाचकांप्रमाणे सोशल मीडियावर भोले बाबाची प्रवचनं सापडणार नाही. त्याचं ऑफिशियल अकाऊंटही नाही.


भोले बाबाचा प्रवचन कार्यक्रम दर आठवड्याच्या मंगळवारी आयोजित केला जातो. ज्यात हजारो लोकं सहभागी होतात. या कार्यक्रमात लोकांसाठी खाण्याची व्यवस्थाही केलेली असते.


कोरोना काळात प्रतिबंध असतानाही भोले बाबाने हजारो लोकांची गर्दी जमवली होती. यामुळे तो चर्चेत आला होता.

VIEW ALL

Read Next Story