पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृत भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलं आहे. 30 डिसेंबर पासून अमृत भारत एक्सप्रेस धावू लागेल.
चला तर मग जाणून घेऊया अमृत भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय फरक आहे.
वंदे भारतमध्ये 16 कोच आहेत. यात चार कोच सेकंड क्लास तर एक कोच हा फस्ट क्लास असतो.
22 बोगी असलेल्या या ट्रेनमध्ये एसी कोचऐवजी सर्व डबे स्लीपर आणि जनरल असणार आहेत.
वंदे भारतचा स्पीड हा प्रती तास 180 किलोमीटर असा आहे. तर याउलट अमृत भारत एक्सप्रेसचा स्पीड प्रति तास 130 किलोमीटर असा असणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या दोन्हीं ट्रेनमध्ये पुश- पुल टेक्निक आहे. या गाड्यांना दोन्ही बाजुंनी इंजिन असतात.
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये वंदे भारतसारख्या आधुनिक सुविधा आहेत.
एका रिपोर्टनुसार अमृत भारत ट्रेन सामान्यांसाठी ट्रेन आहे. ज्याचा तिकिटांचा दर हा वंदे भारतपेक्षा कमी असेल.