प्रत्येक सकाळही नवी उमेद आणि उत्साह घेऊन येते. रात्रभर आराम केल्यानंतर सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्या ताजेतवाने वाटते.
पण सकाळी उठल्यावर कुठल्या वस्तु चुकूनही पाहू नये?, याबद्दल वास्तु शास्त्रात माहिती देण्यात आली आहे.
सकाळी उठल्यावर या वस्तू पाहिल्यास मनात नकारात्मक विचार येतात आणि संपूर्ण दिवस खराब जातो, असे वास्तु शास्त्रात म्हटलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यावर उष्टी, खरकटी भांडी दिसणं शुभ नसतं. असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे खरकटी भांडी रात्रीच घासण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळी उठल्यावर स्वत:ची किंवा दुसऱ्याची सावली पाहून नये. असे करुन आपण राहुला आमंत्रण देतो आणि त्याचा सामना करावा लागतो. यामुळे दिवसभर कामात अडथळे येतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
उठल्यावर लगेच आरशासमोर जाऊ नका. उठल्यावर सर्वात आधी आराध्य देवतेचे दर्शन घ्यावे. नेहमीच्या विधीनंतरच आरसा पाहावा, असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.
घरात बंद घड्याळ असणं वाईट काळाचे संकेत देते. बंद घडी पाहिल्याने वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. कामात वारंवार अडथळे येतात. असे वास्तुशास्त्रात म्हटलंय.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)