सनातन धर्मात वास्तु शास्त्राला खूप महत्व आहे.
घरातील निगेटीव्ह एनर्जी दूर करुन पॉझिटीव्ह एनर्जीसाठी वास्तू टीप्स महत्वाच्या आहेत.
वास्तु शास्त्रात घराचे बेडरुम, किचन, बाथरुम, शिड्या आणि खिडक्यासंबंधी नवे नियम बनवले आहेत.
हे नियम फॉलो केल्यास घरातील संकटे हळुहळू कमी होतात.
घरातील निगेटीव्ह एनर्जी घालवण्यासाठी टीप्स फॉलो करा.
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरातील दक्षिण-पश्चिम दिशेला पंचमुखी हनुमानाची मुर्ती किंवा फोटो लावावा.
वास्तूदोष घालवण्यासाठी चांदी, पितळ किंवा तांब्याचे पिरामिड्स आणा. यामुळे यशाचे मार्ग खुले होतात.
घरच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले मडके ठेवणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त कासवदेखील ठेवले जाऊ शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)