महत्त्वाची टीप

ही माहिती सामान्य समजूतींवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.

नोकरी आणि एकमेकांना देणारा वेळ

लग्नानंतर नोकरी आणि वेळेचा प्रश्न निर्माण झाला की नात्यात तणाव वाढतो. हे टाळण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी त्यांची नोकरी, वेळ याविषयी आधीच चर्चा करा.

शारिरीक संबंध

हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे ज्याकडे बहुतेक लोक सोयीस्कर नसल्यामुळे दुर्लक्ष करतात. लग्नाआधी तुमचा जोडीदार प्रणयाबद्दल काय विचार करतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

सवयी जाणून घ्या

लग्नाआधी तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडीबद्दल नक्की विचारा. असे केल्याने अर्ध्याहून अधिक गोष्टी आपोआप सोप्या होतील.

फॅमिली प्लॅनिंग

लग्नापूर्वी जोडीदारासोबत कुटुंब नियोजनावर चर्चा करणे खूप गरजेचे आहे. किती मुलांची गरज आहे, त्यांचे संगोपन कसे होईल, मुलांमधील अंतर किती असेल इत्यादींची चर्चा आधीच केलेली बरी.

करिअर आणि पैसा यावर चर्चा करा

जर लग्न ठरले असेल तर आर्थिक बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमच्या करिअरबद्दलही चर्चा करा.

प्रथा, परंपरा आणि रुढी

प्रत्येक कुटुंबाच्या स्वतःच्या प्रथा असतात. लग्नापूर्वी दोघांनीही एकमेकांच्या घरातील परंपरा आणि चालीरीतींबद्दल चर्चा करायला हवी.

या गोष्टींचा नक्कीच विचार करा...

VIEW ALL

Read Next Story