भारता नद्या या फक्त जलस्त्रोत नसून, त्यांना धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्वंसुद्धा प्राप्त आहे. एक नदी मात्र इथं अपवाद ठरते.
या नदीच्या पाण्याला कोणीही स्पर्श करत नाही. उत्तर प्रदेशात या नदीचं अस्तित्वं असून तिचं नाव आहे कर्मनाशा. स्थानिकांच्या मते या नदीला अपवित्र मानलं जातं.
या नदीच्या नावाचा अर्थ आहे, कर्माचा विनाश करणारी नदी. स्थानिकांची अशी धारणा आहे की या नदीच्या पाण्याला स्पर्श केल्यानं चांगली कर्म व्यर्थ होतात आणि शुभकार्यात अडथळे येतात.
याच धारणांमुळं या नदीच्या पाण्याला कोणीही स्पर्श करत नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशातून ही नदी प्रवाहित होत असून, तिचा एक मोठा भाग उत्तर प्रदेशातून वाहतो.
सोनभद्र, चंदौली, वाराणासी आणि गाजीपूरहून ही नदी बक्सर इथं गंगेच्या पात्रात मिसळले. कैक वर्षांपूर्वी या नदीच्या पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता.
पौराणिक कथांनुसार राजा हरिश्चंद्राचे पिता सत्यव्रत यांनी गुरु वशिष्ट यांच्याकडे सशरीर स्वर्गलोकी जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण ती अस्वीकारार्ह ठरली. हीच विनंती त्यांनी विश्वामित्र यांच्याकडे केली आणि त्यांनी सत्यव्रताला सशरीर स्वर्गात पाठवलं.
हे पाहून इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी राजाला उलटं करूनच पृथ्वीकडे पाठवलं. विश्वामित्रानं आपल्या शक्तीनं सत्यव्रताला आकाशातच रोखलं आणि या संघर्षात राजा उलटाच राहिला. यावेळी त्यांच्या तोंडातून जी लाळ निघाली तिच ही पृथ्वीवर प्रवाहित झालेली नदी. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)