निधीवन... एक अशी रहस्यमयी जागा जिथं रात्री बंद होतात मंदिराचे प्रवेशद्वार

Sayali Patil
Feb 27,2025

वृंदावन

वृंदावनातील निधीवन ही एक अतिशय पवित्र जागा असून, हे ठिकाण तिथं असणाऱ्या रहस्यमयी वातावरणासाठी ओळखलं जातं.

निधीवन

असं म्हणतात की, निधीवनात रात्रीच्या वेळी भगवान श्रीकृष्ण आणि राधारानी नृत्य करण्यासाठी येतात. रात्रीच्या वेळी इथं दिव्य लीला अनुभवता येतात असं म्हणतात म्हणूनच इथं येण्यास मनाई असते.

धारणा

स्थानिकांची अशी धारणा आहे की, इथं रात्रीच्या वेळी येणाऱ्यांना आजारपणाचा विळखा बसतो.

वृक्ष आणि वेली

निधीवनात वृक्ष आणि वेली विविध रुपांमध्ये असून, ते एकमेकांमध्ये गुंतल्याचं पाहायला मिळतं. भक्तांच्या विश्वासानुसार येथील माती कृष्णाच्या स्पर्शानं पवित्र झाली आहे.

रहस्य

आजही निधीवनातील रहस्य आणि गुपितं अनुत्तरित असून, या ठिकाणाच्या अध्यात्मिकतेकडे सर्वच आकर्षित होतात. येथील मंदिरात सकाळी पक्ष्यांचा सुमधूर आवाज ऐकू येतो.

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 याची खातरजमा किंवा कोणत्याही गोष्टीस दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story