भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांना इथल्या प्रत्येक गोष्टीबद्दल फार उत्सुकता असते. भारतात राहून तो त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.
मला हिंसाचार आवडत नाही, पण मी हा चित्रपट बघेन, असे एलिस वासेपूर चित्रपट पाहण्याआधी म्हणाले होते.
मी गॅंग्स ऑफ वासेपूर चित्रपट पाहिला. त्यात काही मनोरंजक शब्द आहेत. ते पाहून माझ्या भाषेत भर पडली आहे. मी दुसरा भागही पाहणार आहे.
मी पंचायत वेब सीरिज पाहत होतो. खूप छान सिरीज आहे. त्यामुळे माझी हिंदी भाषा सुधारली, असे एलिस यांनी म्हटलं आहे.
"मी लगान चित्रपट पाहिला आहे त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी म्हणतो, दुगना लगान देना पडेगा," असे एलिस म्हणाले होते.
ब्रिटीश उच्चायुक्त एलिस अनेकदा मनोरंजक ट्विट पोस्ट करतात जे त्यांच्या फॉलोअर्सचे मनोरंजन करतात
स्थानिक भारतीय खाद्यपदार्थ आणि देशातील विविध प्रकारच्या स्ट्रीट फूड पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीही तो सोडत नाही. जेवणाचे शौकीन असलेले उच्चायुक्त अनेकदा वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रसिद्ध खाण्याचे पदार्थ खात असतात.
त्यांनी फेब्रुवारीमध्ये बेंगळुरूमध्ये खुसखुशीत डोसा, सांबर आणि नारळाच्या चटणीचा आस्वाद घेतानाचा एक फोटो पोस्ट केला होता.
हिंदी दिवसानिमित्त भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी सर्व देशवासियांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या.