तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेन फार आरामदायी आणि किफायतशीर ठरते.
पण प्रवास पूर्ण केल्यानंतर ट्रेन कुठे जाते? कधी विचार केलाय का?
तुमचा प्रवास झाला की तुम्ही स्टेशन सोडता पण ट्रेनला खूप मोठा पल्ला गाठायचा असतो.
प्रवास पूर्ण केल्यानंतर यार्डमध्ये जाते.
ट्रेन यार्ड अशी जागा आहे जिथे गाड्या पार्क केल्या जातात.
रेल्वे देखभाल, डबे चढवणे डबे उतरवणे, जोडणे किंवा कमी करणे अशी कामे केली जातात.
स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवाससाठी ट्रेन स्टेशनवर पाठवली जाते.
प्रत्येक प्रवासानंतर ट्रेनची अशी प्रक्रिया पार पडते.
इंजिन इंधन भरण्यासाठी आणि तांत्रिक तपासणीसाठी कार्यशाळेत पाठवले जाते.