भारतातही आता उपबल्ध

गुगलने भारतात कार क्रॅश डिटेक्शन फीचर लाँच केले आहे. यापूर्वी, हे फिचर केवळ अमेरिकेसह काही निवडक देशांमध्ये उपलब्ध होते. परंतु आता ते भारतातही उपलब्ध असणार आहे.

भारतात उपयुक्त

भारतासारख्या देशात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अपघातानंतर जखमी व्यक्तीला वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध न होणे आहे. त्यामुळे गुगल कार क्रॅश डिटेक्शन फीचर हे काम सोपे करण्यास मदत करेल.

कसे करते काम?

Google Pixel फोनमध्ये असलेले फिचर अपघात झाल्यास सुरु होईल आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकावर आपोआप कॉल करेल, जेणेकरून मदत त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

नऊ वर्षापूर्वी आले होते फिचर

कार अपघातात सुरक्षा देणारे फिचर पहिल्यांदा 2014 मध्ये पिक्सेल फोनमध्ये सुरु करण्यात आले होते. हे फिचर फोनचे लोकेशन, मोशन सेन्सर आणि आसपासचे आवाज वापरून कोणतीही दुर्घटना ओळखू शकते.

पाच नवीन देशांमध्ये फिचर उपलब्ध

हे फिचर, जे फक्त अमेरिकेत उपलब्ध होते, आता Google ने भारत, ऑस्ट्रिया, बेल्जियम, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड या पाच देशांमध्ये आणलं आहे.

कसे कराल सुरु?

सर्वप्रथम तुमच्या डिव्हाईसमध्ये पर्सनल सेफ्टी अॅप्लिकेशन ओपन करा. यानंतर तुम्हाला 'फीचर्स' ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 2

खाली नेव्हिगेट केल्यानंतर तुम्हाला 'कार क्रॅश डिटेक्शन' पर्याय मिळेल. येथे 'सेट अप' वर टॅप करा. यानंतर तुम्हाला लोकेशन, मायक्रोफोन ट्रॅक करण्यासाठी या अॅपला परवानगी द्यावी लागेल.

VIEW ALL

Read Next Story