आपल्या देशात आर्थिक स्थिती भक्कम नसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा लोकांना, कुटुंबांना पाठबळ देण्यासाठी राज्य तसंच केंद्र सरकार नेहमी वेगवेगळ्या योजना आखत असतं.
जेणेकरुन त्यांना आर्थिक मदत मिळेल आणि फार समस्यांचा सामना करावा लागणार नाही. यासह त्यांना सामाजिक स्तरावरही सशक्त करण्याचा प्रयत्न असतो.
उत्तर प्रदेश सरकारने अशीच एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेचं नाव "नॅशनल बेनिफिट स्कीम"(National Family Benefit Scheme) असं आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या नॅशनल बेनिफिट स्कीम अंतर्गत जर गरिब कुटुंबातील कमावत्या किंवा प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या गरिब कुटुंबाला 30 हजारांची आर्थिक मदत दिली जाते.
तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न ४६ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेंतर्गत अर्ज करू शकता.
ही योजना फक्त ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
तुम्ही शहरात राहत असाल आणि तुमच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न ५६ हजार रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
जर तुम्ही या योजनेचे निकष पूर्ण केले तर तुम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेऊ शकता.