Advocate आणि Lawyer काय फरक आहे? न्यायालयात अशिलाची बाजू कोण मांडतो?
तुम्हालाही लॉयर (वकील) आणि अॅडवोकेट (अधिवक्ता) या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटत का?
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात लॉयर आणि अॅडवोकेट या दोघांमध्ये फरक आहे.
लॉयर तो असतो ज्याने कायद्याची पदवी (LLB) घेतली आहे.
लॉयर हा व्यक्तीला कायदेशीर सल्ला देण्याचं काम करू शकतो. मात्र तो न्यायालयात कोणत्याही व्यक्तीसाठी खटला लढू शकत नाही.
तर अॅडवोकेट म्हणजे ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण करुन स्टेट बार कौन्सिलमध्ये सहभागी होतो.
अॅडवोकेट हा न्यायालयात अशिलाची बाजू मांडू शकतो.