नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून रविवारी, 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
मोदींबरोबरच अन्य 72 नेत्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र कारभार आणि राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
मोदींच्या कॅबिनेटमध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र कारभार राज्यमंत्री आणि उर्वरित राज्यमंत्री आहेत.
मात्र कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कारभार राज्यमंत्री आणि राज्यमंत्री यामध्ये फरक काय असतो ठाऊक आहे का? चला जाणून घेऊयात...
कॅबिनेट मंत्री हे पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळाचा भाग असतात. ते थेट पंतप्रधानांना उत्तर देण्यास बांधील असतात.
कॅबिनेट मंत्र्यांकडे स्वतंत्र मंत्रालयाचा कारभार सोपवला जातो. त्या मंत्रालयाची संपूर्ण जबाबदारी या मंत्र्याची असते.
कॅबिनेट मंत्र्यांकडे एकाहून अधिक मंत्रालयांचा कारभार सोपवला जाऊ शकतो. कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित असतं.
कॅबिनेट मंत्र्यांखालोखाल येतात ते स्वतंत्र कारभार सोपवण्यात आलेले राज्यमंत्री. हे सुद्धा थेट पंतप्रधानांना उत्तर देण्यास बांधील असतात.
स्वतंत्र कारभार असलेल्या मंत्र्यांवरही त्यांना सोपवण्यात आलेल्या मंत्रालयाची जबाबदारी असते. मात्र ते कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाही. (फोटोत - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव)
राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्यासाठी नियुक्त केले जातात. राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांना बांधील असतात. ते कॅबिनेट मंत्र्यांना आपल्या कामाचे अहवाल आणि शिफारशी सादर करतात. (फोटोत राज्यमंत्री रक्षा खडसे)