750, 875, 916; दागिन्यांवर लिहिलेल्या 'या' नंबरचा अर्थ काय?

Aug 21,2024

जेव्हा कधी तुम्ही सोनं खरेदी करायला जात असाल तेव्हा त्यावर लिहिलेल्या क्रमांकाकडे विशेष लक्ष द्या. हा नंबर सोन्याचा दर कमी, जास्त करत असतो.

प्रत्येक ज्वेलरीवर एक हॉलमार्क असतो आणि त्यावर एक नंबर असतो ज्यावरुन सोन्याचा दर्जा समजतो.

दागिन्यासाठी वापरण्यात आलेलं सोनं 18 कॅरेट आहे की 22 कॅरेट आहे हे सांगतं. अनेक डायमंड ज्वेलरी 18 कॅरेटच्या असल्याने हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

अनेक ज्वेलर्स 18 कॅरेट ज्वेलरीसाठी 22 कॅरेटचे पैसे घेतात, त्यामुळे हा नंबर पाहणं महत्त्वाचं आहे.

जर ज्वेलरीवर 916 लिहिलं असेल तर ती 22 कॅरेटची आहे आणि 875 लिहिली असेल तर 21 कॅरेट आहे.

जर ज्वेलरीवर 750 लिहिलं असेल तर 18 कॅरेट सोन्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे ज्वेलर तुम्हाला नेमका कोणता रेट लावत आहे हे जाणून घेऊ शकता.

हा नंबर पाहिल्यानंतर तुम्ही गोल्ड रेट चेक करु शकता आणि मेकिंग चार्जचे पैसे देऊन दागिने खरेदी करु शकता.

VIEW ALL

Read Next Story