कुराण हा इस्लाम धर्मात सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो.
कुराणाचा अपमान करणाऱ्यांना कोणती शिक्षा मिळते?
पाकिस्तानच्या इस्लामिक विचारधारा परिषदचे अध्यक्ष डॉ. रगिब हुसैन नईमी यांवर विधान केलंय.
कुराणाचा अपमान केल्यास खूप कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे ते म्हणाले.
कुराणाबद्दल अपमानजनक भाषा वापरल्यास आजीवन कारावास होऊ शकतो,असे ते म्हणाले.
डॉ. रगिब हुसैन नईमी यांच्यानुसार, कुराणची निंदा केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा नाहीय, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
इस्लामच्या पैंगबरांची निंदा केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, असे ते म्हणतात.
काही धार्मिक ग्रुप कायदा, नियम तोडून मोडून आपल्या सोयीनुसार सांगतात.
कुराणचा अपमान करणाऱ्याला घोळक्याने मारण्याची चुकीची गोष्ट काही लोक करतात. हे गैर इस्लामिक असून कायद्याच्या विरोधात आहे.
धार्मिक समूह राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळतात, असेही ते म्हणाले.
कोणाच्या मृत्यूसाठी फतवा जारी करणं है गैर इस्लामिक असून शरीयाच्या विरोधीदेखील असल्याचे ते म्हणाले.