NCRB च्या रिपोर्टनुसार, वर्षभरात हजारो लोकांना अश्लील व्हिडीओ विकल्या प्रकरणी अटक केली जाते.
भारतात अश्लील व्हिडीओ बनवणे आणि विकणे हा मोठा गुन्हा असल्याचे मानले जाते.
यामुळे अश्लील व्हिडीओ विकल्याने किंवा बनवल्याने मोठी शिक्षा देखील होऊ शकते.
भारतीय दंड संहितेच्या कलम 292 अंतर्गत अश्लील व्हिडीओ विकणे दंडनीय आहे.
जर एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदा अश्लील व्हिडीओ विकल्यास त्याला दोषी ठरवून आरोपीला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 2000 हजार रुपयांपर्यंत दंड देखील होऊ शकतो.
दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 5 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
18 वर्षांपेक्षा लहान व्यक्ती आढळला तर 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांपर्यंत दंड. पुन्हा तो दोषी आढळल्यास 7 वर्षे तुरुंगवास आणि 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.