दिल्लीच्या लाल किल्ल्यवर 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवला जातो.
या वास्तूला लाल किल्ला म्हणून ओळखले जाते. पण याचे खरे नाव वेगळेच आहे.
लाल किल्ल्याचे जुने नाव किला ए मुबारक होते. लाल दगडांच्या बांधकामामुळे याला लाल किल्ला म्हटले जाऊ लागले.
आजही अनेक सरकारी कार्यालयांमध्ये किला ए मुबारक असे नाव नोंद केलेले आहे.
लाल किल्ल्याचा पाया 1638 मध्ये घातला गेला आणि 1648 मध्ये काम पूर्ण झाले.
मुघल बादशाह शाहजहाने मुघल राजधानी आग्राहून दिल्लीत शिफ्ट करण्यासाठी हे बनवले होते.
हा किल्ला 2.4 किलोमीटर एरियामध्ये बनलाय. याचे क्षेत्रफळ 254.67 एकर इतके आहे.
लाल किल्ला बांधण्यासाठी किती रुपये खर्च आला? याची माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार यासाठी 1 कोटी इतका खर्च आला.