SIP कधी थांबवायला हवी? 99 टक्के लोकांना नसेल माहिती!

Pravin Dabholkar
Mar 06,2025


आजकाल एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण मार्केट कोसळायला लागलं की गुंतवणूकदारांची द्विधा मनस्थिती होते.


अशावेळी एसआयपी बंद करावी असे अनेकांना वाटते. पण एसआयपी काढण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल जाणून घेऊया.


जर तुमची कमाई अचानक कमी झाली असेल. किंवा तुमच्यासमोर अचानक कोणतं आर्थिक संकट आलं असेल तर एसआयपी काढू शकता.


मेडिकल एमर्जन्सी किंवा इतर अधिक महत्वाच्या कामासाठी तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर एसआयपी काढू शकता.


जर तुम्ही चुकीचा फंड निवडला असले ज्यात तुम्हाला सारखे नुकसानच होत असेल तर एसआयपी थांबवू शकता.


तुम्ही एखादं आर्थिक लक्ष्य पूर्ण केले असेल तर एसआयपी थांबवू शकता.


तुमच्याकडे जास्त फायदा मिळवून देणारा पर्याय उपलब्ध असेल तर एसआयपी थांबवू शकता.


एखादा फंड सलग वाईट परफॉर्मन्स देत असेल तर ती एसआयपी थांबवण्याची वेळ आलेली असते.


तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी जास्त झाली असेल तुम्हाला ताळमेळ साधायचा असेल तर योग्य असेट अलोकेशन करु शकता.


जर तुमची एसआयपी ट्रॅक आणि मॅनेज करु शकत नसाल किंवा प्लानिंग न करता गुंतवणूक करत असाल तर एसआयपी थांबवू शकता.


सलग मार्केट पडतंय म्हणून घाबरत असाल तर लॉंन्ग टर्मचा विचार करुन एसआयपी सुरु ठेवा.

VIEW ALL

Read Next Story