भारतात अनेक गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते.
गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी सुद्धा एका खास प्रकारच्या दोरीचा वापर केला जातो.
गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीला मनीला रोप सुद्धा म्हटले जाते.
या दोरीला हे नाव यासाठी पडलं होतं कारण पहिल्यांदा ही दोरी फिलिपिन्स येथील एका झाडापासून बनवण्यात आली होती.
फाशीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीवर पाण्याचा काहीही फरक पडत नाही. ही दोरी पाणी शोषून घेते.
भारतात फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी ही बक्सरच्या जेलमध्ये बनवली जाते.
बिहारच्या बक्सर जेलमध्ये 1930 पासून गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी वापरली जाणारी दोरी बनवली जाते.