मालदीव हे अनेक भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ आहे.
मालदीव हा हिंदी महासागरातील एक सुंदर देश आहे. जेथील नैसर्गिक सौंदर्य खूपच छान आहे.
या ठिकाणी अनेक भारतीय सुट्टीच्या दिवसांमध्ये जात असतात. पण तिथे असा एक बीच आहे जिथे तुम्ही बिकिनी परिधान करू शकत नाही.
मालदीवमध्ये फक्त मुस्लिमांना नागरिक मान्यता मिळते. त्यामुळे तेथील सर्व स्थानिक बेटांच्या ठिकाणी बिकिनी घालण्यास मनाई आहे.
या ठिकाणी फक्त रिसॉर्ट्स किंवा नियुक्त बीचवर बिकिनी परिधान करण्यास परवानगी आहे.
कारण मालदीव इस्लामिक रीतिरिवाजांचे पालन करतो. त्यामुळे तेथील स्थानिक बेटांवर सामान्य कपडे घालणे अनिवार्य आहे.
त्यामुळे जर तुम्ही कधीही मालदीवला जाणार असाल तर तिथल्या ड्रेस कोडबद्दल माहिती वाचून जा.