भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. आजच्या धावपळीच्या जगात ट्रेन अनेकांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे.
देशात दररोज हजारो ट्रेन धावतात आणि यामधून लोक लाखोंच्या संख्येने प्रवास करतात.
परंतु, तुम्हाला देशातील सर्वात वेगवान ट्रेनविषयी माहितीये? जाणून घ्या याबद्दल सविस्तर.
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन 180 किमी प्रतितासच्या वेगाने धावू शकते.
तेजस एक्सप्रेस ही भारतातील सुपर लक्झरी ट्रेन असून तिची 200 किमी प्रतितासच्या वेगाने धावण्याची क्षमता आहे. मात्र, सुरक्षा आणि ट्रॅक प्रतिबंधामुळे 130 किमी प्रतितासच्या वेगाने धावते.
शताब्दी एक्सप्रेस ही देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असून तिचा वेग 130 ते 150 किमी प्रतितास इतका आहे.
भारतात राजधानी एक्सप्रेसचा वेग जास्तीत जास्त 140 किमी प्रतितास इतका आहे. मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही देशातील सर्वात वेगवान राजधानी एक्सप्रेस आहे.