भारत हा असा देश आहे जिथे संमिश्र संस्कृती आहे. येथे अनेक धर्मांचे लोक राहतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतातील सर्वात आनंदी राज्य कोणते आहे? जाणून घ्या सविस्तर
2023 मध्ये एका अभ्यासात म्हटले आहे की, 'मिझोराम' हे भारतातील सर्वात आनंदी राज्य आहे.
गुरुग्राममधील व्यवस्थापन विकास संस्थान रणनीतीचे प्राध्यापक राजेशच्या पिलानिया यांनी एक अहवाल सादर केला. यामध्ये मिझोराम हे सर्वात आनंदी शहर असं म्हटलं आहे.
या अहवालात साक्षरता दर, कौटुंबिक संबंध, सामाजिक समस्या, धर्म, शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या आधारे मिझोरामला हा दर्जा मिळाला आहे.
येथील विद्यार्थी लहान वयातच कमाईला सुरुवात करतात. लहान वयातच आर्थिकदृष्टया मजबूत होतात.