भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.
भारताचं क्षेत्रफळ हे 33,87,263 वर्ग किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे.
सध्या भारतात एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
भारतात एकूण 797 जिल्हे असून यातील 757 जिल्हे हे 28 राज्य तर 45 जिल्हे हे 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा हा कच्छ (गुजरात) आहे.
कच्छचं क्षेत्रफळ हे 45,674 वर्ग किलोमीटरपर्यंत पसरलं असून त्याचं क्षेत्रफळ हे भारतातील 9 राज्यांपेक्षा जास्त आहे.
कच्छचं क्षेत्रफळ हे केरळ, हरियाणा, गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, मिजोराम, मणिपूरम, मेघालय इत्यादींपेक्षाही जास्त आहे.