प्रवासवेड्या मंडळींसाठी युरोप हे सर्वाधिक पसंती असणारं एक ठिकाण. अशा या ठिकाणाला एकदातरी भेट द्यावी अशीच अनेकांची इच्छा.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण भारतातही युरोपसारखंच एक ठिकाण आहे जिथं जाणं तुम्हाला कमालीचं स्वस्तही पडेल आणि युरोपहून कमाल अनुभवही येईल.
भारतात गोवा राज्यात काही असे अप्रतिम समुद्रकिनारे आहेत. जिथं गेलं असता अगदी आपण परदेशातील एखाद्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर असल्याचाच भास होतो.
हिमाचल प्रदेशाली बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहताना युरोपातील आल्प्स पर्वतांचीच आठवण होते.
केरळातील बॅकवॉटर्समध्ये फिरणं तुम्हा व्हेनिसच्या कालव्यांमधून फिरण्यापेक्षा कमाल अनुभव देऊन जातील.
युरोपातील भव्य महालांप्रमाणेच राजस्थानातील वर्षानुवर्षांपूर्वीचे महाल तुम्हाला राजेशाही जगण्याची झलक दाखवतील.