अनेकांना विमानात एक-दोन इंजिन असतात हे माहित आहे.
मात्र,काही खास विमानांमध्ये चार इंजिन बसविण्यात आले आहेत. या इंजिनांच्या मदतीने विमाने जास्त प्रमाणात वजन उचलू शकतात.
यासोबतच हे चार इंजिन असणारे विमान लांब अंतरापर्यंत उड्डाण करू शकतात.
एअरबस ए 380-800 विमानात चार इंजिन आहेत. जे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे.
हे एक डबल-डेकर विमान आहे. ज्यामध्ये 850 प्रवासी प्रवास करू शकतात.
हे विमान सिंगापूर एअरलाइन्स, लुफ्थांसा सारख्या प्रमुख विमान कंपन्यांद्वारे चालवले जाते.
यासोबतच बोइंग 747-8 या विमानात देखील चार इंजिन लावले जातात.