वेळेची बचत करत परदेशातील ठिकाण गाठण्यासाठी किंवा एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी विमानाचा प्रवास हा अनेकांना सोयीस्कर वाटतो.
भारतात एकूण 137 विमानतळ असून त्यामध्ये 103 डोमेस्टिक विमानतळ, 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 10 सीमा शुल्क विमानतळांचा समावेश आहे.
राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल तर जवळपास सर्वचजण जाणत असतील. पण तुम्हाला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणाऱ्या राज्याबद्दल माहितीये का?
भारतातील एकूण 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ असून त्यातील सर्वाधिक विमानतळ ही उत्तर प्रदेश या राज्यात आहेत.
उत्तर प्रदेशात एकूण 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असून त्यात अयोध्या शहरातील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, कुशीनगरमधील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लखनऊ मधील चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे.
तसेच, वाराणसी मधील लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे. त्यातील नोएडा विमानतळाचं काम अद्याप सुरू आहे.
भारतातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद मध्ये आहे. या शहरातील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळपास 5500 एकरमध्ये पसरलेलं आहे.