आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी सुरु केलेली आरोग्य योजना आहे.
या योजनेअंतर्गत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचारांसाठी कव्हर मिळतो.
आयुष्यमान भारत योजना ही योजना सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये कव्हर प्रदान करते.
आयुष्यमान भारत योजनेत ५ लाख रुपयांचे मोफत उपचार आणि रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची तपासणी समाविष्ट असते.
रुग्णालयात उपचार, जेवण आणि डिस्चार्जनंतरची तपासणी इत्यादी गोष्टी या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत फ्री मिळतात. शिवाय औषध सुद्धा मोफत मिळतात.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार, मोतीबिंदू, डायलिसिस आणि डेंग्यू इत्यादींवर उपचार प्रदान करते.
आयुष्यमान भारत योजनेशी संबंधित सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांची सुविधा देखील उपलब्ध आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी जवळील सरकारी दवाखाने किंवा डॉक्टरांकडून माहिती घ्या. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)