कायदा सुव्यवस्था राखणं आणि गुन्हे होण्यापासून रोखणं हे आयपीएसचं काम असतं.
यूपीएससीच्या माध्यमातून आयपीएसची निवड होते. यात प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा 3 स्टेप्स असतात.
आयपीएस अधिकाऱ्यांना विशेष ट्रेनिंग दिली जाते.
ब्रिटीश शासन काळात आयपीएसना इम्पेरियल पोलीस म्हटलं जायचं. 1948 नंतर ते आयपीएसमध्ये बदललं गेलं.
आयपीएस सेवेत डीजीपी हे सर्वात मोठे पद असते. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस राज्यातील पोलिस विभागाचे महत्वाचे पद असते.
पण आयपीएस अधिकाऱ्याला कोण सस्पेंड करु शकतं? तुम्हाला माहिती आहे का?
ते ज्या राज्यात कार्यरत असतात त्या राज्य सरकारला त्यांना सस्पेंड करण्याचा प्राथमिक अधिकार असतो.
केंद्र सरकारला देखील सस्पेंड करण्याचा अधिकार आहे, विशेषतः जेव्हा IPS अधिकारी केंद्र सरकारच्या विभागात (जसे CBI, IB) कार्यरत असतात. यासाठी गृह मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते.
राज्यातील मुख्यमंत्री हे सस्पेंड करण्याच्या प्रक्रियेत सर्वोच्च निर्णय घेणारे असतात. ते गृहमंत्र्यांच्या सल्ल्याने किंवा स्वतंत्रपणे आदेश जारी करू शकतात