डोसा या पदार्थाच्या बऱ्याच गोष्टी आहेत. याचा शोध पाचव्या शतकात कर्नाटकमधील उडपी शहरात लागला होता.
असं म्हटलं जातं, प्राचीन काळातील एका पुजारींना मद्य पिण्याची सवय होती. त्यांनी तांदळाच्या पेस्टपासून मद्य बनवण्याचा प्रयत्न केला.
पण नंतर त्यांच मन बदललं, त्यांनी तांदळाच्या पेस्टला पॅनवर गोल आकारात पसरवलं आणि त्या पदार्थाला 'दोषा' हे नाव दिलं.
त्यांच्या मनात 'दोष' होता. ते पुजारी असून असं करमार होते. मग नंतर लोक या पदार्थाला डोसा असं म्हणू लागले.
उडपीतील पदार्थांचा संबंध महाभारताशी जोडलेला आहे. असं मानलं जातं. याचीही एक गोष्ट आहे.
18 दिवसांपर्यंत उडपी नरेशनं महाभारताच्या 50 लाख सैनिकांसाठी जेवणाचा सोय केली होती. आज किती सैनिकांचा मृत्यू होणार आहे. हे त्यांना आधीच माहित असायचं मग ते उरलेल्या सैनिकांसाठीच जेवण बनवायचे.
"तुम्हाला हे कसं कळतं?" लोकांनी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, मी भगवान श्री कृष्णांना शेंगा खायला देतो. ते खाऊन जेवढी टरफल टाकतील तेवढी लोकं कमी होणार.
आणखी एका गोष्टीत असं म्हटलय की इ. स. 1126 साली उडपीमध्ये डोसा पदार्थाचा शोध लागला. कर्नाटकमध्ये राज्य करणाऱ्या चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय यांनी आपल्या मानोसोल्लास ग्रंथात दोसाका नावानं डोसा बनवण्याची पाककृती लिहिली होती.