भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही नुकताच असा एक विमानप्रवास केला. हा विमानप्रवास त्याच्यासाठी अतिशय खास होता. त्यामागे असंच एक कारणही होतं.
माहीनं यावेळी इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला आणि सर्वजण थक्क झाले. धोनीच्या या प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओही व्हायरल झाला जिथं एक एअरहॉस्टेस त्याला चॉकलेट्स देताना दिसली.
बस्स, मग काय? सोशल मीडियावर या Air Hostes चीच चर्चा सुरु झाली. माहीच्या पुढे चॉकलेट्सनं बरलेला ट्रे आणणारी ती आहे तरी कोण? हाच प्रश्न अनेकांना पडला.
सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार त्या एअर हॉस्टेसचं नाव, निकीता जैस्वाल. मुळची दिल्लीची दिल्लीची असणारी ही एअरहोस्टेस धोनीची चाहती आहे.
आता ती त्या विमानात ड्युटीसाठी आहे, तिथं धोनी आल्याचं कळताच ती कशी बरं स्वत:ला आवरेल?
निकिताचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि तिनं अनोख्या अंदाजात एअरवेजच्या वतीनं त्याचं स्वागत केलं.
माहीनंही तिला नाराज न करता ट्रेमधील चॉकलेट्स घेत त्या सर्व मंडळींचे आभारही मानले.
सेलिब्रिटी आणि एक सर्वसामान्य चेहरा यांच्यात असणारं अनोखं नातं यानिमित्तानं पुन्हा एकदा पाहता आलं. (छाया सौजन्य- निकीता जयस्वाल / फेसबुक आणि सोशल मीडिया )