भारतरत्न पुरस्काराची मानकरी ठरलेली पहिली महिला कोण?

Mar 07,2025

5 महिला

भारतात आजपर्यंत 5 महिला भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. जाणून घ्या, पहिल्यांदा कोणत्या महिलेला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं?

भारतरत्न पुरस्काराची सुरूवात

भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान असून याची सुरूवात 2 जानेवारी 1954 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली होती.

1971 मध्ये

1971 मध्ये पहिल्यांदा देशातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलेला हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी या भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरणाऱ्या पहिला महिला होत्या. 1971 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.

असामान्य योगदान

कोणत्याही क्षेत्रात असामान्य आणि अमूल्य योगदान देणाऱ्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आजपर्यंत भारतातील 5 महिलांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

'या' महिलांचा समावेश

यामध्ये भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, मदर टेरेसा, अरुणा आसफ अली, एमएस सुब्बालक्ष्मी आणि लता मंगेशकर यांचा समावेश आहे.

पुरस्काराचे स्वरुप

'भारतरत्न' लिखित पदक आणि राष्ट्रपतीकडून मान्यताप्राप्त प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

VIEW ALL

Read Next Story