भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला करून पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं.
या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले होते. पण रात्रीच का हवाई हल्ले केले जातात? जाणून घ्या सविस्तर
रात्रीच्या वेळी वैमानिक आणि सैनिकांच्या जीवाला कमी धोका असतो. कारण शत्रूला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळत नाही.
त्यासोबतच रात्री अंधारात विमाने आणि ड्रोन शोधणे कठीण असते. त्यामुळे यंत्रणा त्यांना सहजपणे शोधू शकत नाहीत.
रात्री हल्ला केल्याने शत्रू सतर्क राहत नाही. त्यामुळे प्रभावीपणे हल्ला करता येतो.
तसेच हल्ला यशस्वी झाला आणि नागरिकांचे नुकसान कमी झाले तर आंतरराष्ट्रीय टीका देखील कमी होते.
रात्री शत्रू सतर्क नसल्यामुळे त्यांना लगेच प्रत्युत्तर देणे कठीण होते. त्यामुळे रात्री कारवाई करणे प्रत्येकासाठी आव्हानात्मक असते.