विमानातून एकदा तरी प्रवास करावा असं प्रत्येकाला वाटतं. तो अनुभव खूपच रोमांचकारी असतो.
विमानाचा रंग बहुतांशवेळा पांढराच का असतो? कधी विचार केलाय का?
फक्त एअरलाईन्सचे नाव आणि लोगो रंगीत दिसतात. बाकी सर्व पांढऱ्या रंगात असतं.
खासगी विमाने वेगवेगळ्या रंगाची असतात.
विमानाला पांढरा रंग देण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत.
विमानाचा रंग सुरक्षितता, खर्च आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पांढरा असतो.
विमाने उंचावरुन उडतात. अनेक तास सुर्याच्या संपर्कात असतात. त्यामुळे तापमान वाढू शकते.
विज्ञानानुसार पांढरा रंग कमी उष्णता शोषून घेतो. आणि जहाजाचा रंगही फिका पडत नाही.
वाहतूक सुरक्षा ही विमानाची प्राथमिकता असते. तपासणी दरम्यान भेगा, तेलगळती शोधणे सोपे होते.