भारतात सोन्याची बाजारपेठ खूप जास्त आहे. सोनं खरेदीत भारतीयांचा हात कोणीच पकडू शकत नाही
गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं ग्राहक चिंतेत आहेत
दागिने बनवताना 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. 24 कॅरेट हे कितीही शुद्ध असले तरी त्यापासून दागिने बनवले जात नाहीत
24 कॅरेटचं सोनं हे 99.9 टक्के शुद्ध असतं, म्हणजेच त्यापेक्षा जास्त शुद्ध सोनं असूच शकत नाही
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काही प्रमाणात तांबामिश्रित धातू मिसळला जातो. दागिने हे या 2 कॅरेटमध्येच बनवता येतात
कारण 24 कॅरेट सोनं हे फारच लवचिक असते. त्यामुळं 24 कॅरेटचे दागिने लगेचच तुटू शकतात. म्हणून 22 कॅरेटमध्ये दागिने घडवले जातात