आज ट्रेनसोबतच मेट्रोसुद्धा आपल्या प्रवासाचा अविभाज्य भाग झाला आहे.
रेल्वे ट्रॅकवर तुम्ही दगड टाकल्याचे बघितले असेल.
मात्र मेट्रोच्या रुळांवर दगड नसतात. असे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवले जातात कारण ते ट्रॅक स्थिर ठेवण्यास आणि कंपन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे गाड्या सुरळीत चालू शकतात.
मेट्रो ट्रेनचे ट्रॅक गिट्टी-लेस असतात, म्हणजे दगड नसलेले. मेट्रोचे ट्रॅक काँक्रिट आणि स्टीलच्या संरचनेवर बांधलेले असतात.
वास्तविक, मेट्रो जमिनी खाली आहेत किंवा उंचीवर आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच्या ट्रॅकवर दगड टाकले तर त्यांची देखभाल करणे कठीण होईल.