नववधू आषाढ, श्रावणात माहेरी का जातात? यामागचं खरं कारण तुम्हीही कधी ऐकलं नसेल

Bride maternal: भारतात आषाढ, श्रावण हे महिने शुभ मानले जातात. आषाढ महिन्यात भाविक पंढरपूरला जातात तर श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या दोन महिन्यात नववधू माहेरी जातात. तसेच परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास आणि पूजा करतात. आषाढ, श्रावणात नववधू माहेरी जातात, यामागचे कारण समजून घेऊया.

व्रत वैकल्य

देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी अनेक नववधू आषाढ, श्रावण महिन्यात उपवास करतात. हे व्रत सामान्यतः सोमवारी पाळले जाते. तसेच अत्यंत शुभ मानले जातात. या काळात बहुतांश स्त्रिया त्यांच्या माहेरच्या घरी जातात.

कुटुंबाशी पुन्हा संपर्क

आषाढ,श्रावण महिन्याच्या निमित्ताने माहेरी जाऊन नववधू आई वडिल आणि भावंडांना भेटते. लग्नानंतर माहेरच्यांसोबत वेळ घालवते. वैवाहिक जबाबदाऱ्यांमुळे पालक आणि भावंडांना भेटू न शकलेल्या महिलांसाठी हे महत्वाचे आहे.

वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद

आषाढ, श्रावण महिन्यात वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेण्यासाठी नववधू माहेरी जातात. विठ्ठल तसेच भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जातात. या महिन्यात पुजा केल्यास कुटुंबात सुख, समृद्धी नांदते असे मानले जाते.

वातावरण बदल

आषाढ,श्रावण महिना पावसाळ्यात येतो. जो देशाच्या अनेक भागांमध्ये यावेळी पाऊस पडतो. अशावेळी माहेरच्या आरामदायक वातावरणाचा आनंद घेण्याची संधी नववधूंना यानिमित्ताने मिळते.

सांस्कृतिक कार्यात सहभागी

आषाढ, श्रावणात अनेक कुटुंबे सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करतात. भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक समारंभात त्यांना सहभागी होता येते. माहेरच्या अनेक उपक्रमांमध्ये महिलांना सहभागी होण्याची संधी नववधूला मिळते.

VIEW ALL

Read Next Story