तुम्ही अनेकदा पाहिले असेल की उंच उंच इमारतींवर लाल रंगाचे दिवे लावलेले असतात.
परंतु हे दिवे लाल रंगाचे का असतात? हे तुम्हाला माहिती आहे का?
उंच इमारतींवर लाल दिवा लावण्याचा एक विशेष उद्देश असतो. हा दिवा विमानाच्या इसाऱ्यासाठी वापरला जातो.
या प्रकाशाला एव्हिएशन ऑब्सटेकल लाईट देखील म्हणतात.
कारण रात्रीच्या वेळी विमानांना उंच इमारतींना धोका निर्माण होऊ नये म्हणून हा दिवा लावला जातो.
हा लाल दिवा पायलटला पुढे इमारत असल्याची सूचना देतो. यासाठी फक्त लाल रंगाचा दिवा वापरला जातो. कारण लाल रंग हा सहज दिसू शकतो.