15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे.
देश स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी भारताचे पंतप्रधान दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात.
पण 15 ऑगस्टला दरवर्षी ध्वजारोहण लाल किल्ल्यावरच का केलं जातं याविषयी अनेकांना प्रश्न पडतो.
देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा लाला किल्ल्यावरून ब्रिटीश ध्वज उतरवून तेथे तिरंगा फडकवण्यात आला होता.
मुघल बादशाह शाहजहाँनने दिल्लीला राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला. राजधानीला शोभेल अशी लाल किल्ल्याची उभारणी करण्यात आली.
मुलघलांपासून लाल किल्ला हा राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. लाल किल्ल्याला सत्तेचे केंद्र म्हणून महत्व प्राप्त झाले.
राजकारणात प्रतिकांना खूप महत्व असते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला.
तेव्हा पासून दरवर्षी स्वातंत्र्य दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित करतात.