जगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? जुन्या मुर्त्यांचे काय होतं?

जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झालीय. ओडिशाच्या पुरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सोहळा सुरु आहे. 2-3 दिवस रथयात्रा चालेल असं म्हटलं जातंय.

जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य तुम्हाला माहिती नसतील. दर 12 वर्षांनी जगन्नाथ, बळराम आणि सुभद्राची मूर्ती बदलली जाते. यामागे अनोख कारण आहे.

नकलेवार परंपरा असताना शहराची लाईट जाते आणि तेव्हाच अंधारात मुर्ती बदलल्या जातात.

या प्रक्रियेदरम्यान कोणाचीच नजर मुर्त्यांवर पडायला दिली जात नाही.

जगन्नाथ, बळराम आणि सुभद्रेची मूर्ती लिंबाच्या लाकडापासून तयार होते. 100 वर्षे जुन्या लिंबाच्या झाडाच्या खोडापासून मूर्ती बनवल्या जातात.

भगवान कृष्णाने देहत्याग केला होता तेव्हा त्याचं हृदय पुरीमध्येच राहिल होतं. त्यामुळे जगन्नाथाचं मंदिर म्हणजे साक्षात श्रीकृष्ण असल्याचं म्हटलं जातं.

लिंबाच्या खोड लवकर खराब होऊ शकते, ही भीती भक्तांच्या मनात असते. त्यामुळे दर 12 वर्षांनी मुर्ती बदलल्या जातात.

जुन्या मूर्त्या कोईली वैकूंठ नावाच्या मंदिरात नेल्या जातात. तेथेच त्यांचे विसर्जन केले जाते.

VIEW ALL

Read Next Story