'वंदे भारत'च्या टॉप स्पीडपेक्षा दुप्पट वेगाने उडणारा जगातला सर्वात फास्ट पक्षी; त्याचा Speed आहे...

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

सर्वात वेगवान पक्षी किती?

जगातील सर्वात वेगवान पक्षी पेरेग्राइन फाल्कन म्हणजेच बाज हा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

गुरुडापेक्षा आकाराने लहान

बाजलाच मराठीमध्ये ससाणा असं म्हणतात. हा शिकार करणारा पक्षी असून गुरुडापेक्षा आकाराने लहान असतो.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

शरीराची रचना करते मदत

सासण्याच्या शरीराची रचना त्याला वेगाने उडायला मदत करते. त्याचे पंख हे शरीराच्या तुलनेनं अधिक लांब आणि मजबूत असतात.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

शक्तीशाली पंजा

आपल्या पंजामध्ये छोट्या आकाराचे प्राणी पकडून त्यांना उडून घेऊन जाण्याची क्षमता आणि ताकद या इवल्याश्या पक्षामध्ये आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

उंचावरुन शिकार हेरतो

सासणा फार उंचावरुन आपली शिकार हेरतो आणि जमिनीच्या दिशेने झेपावत सावज टीपतो.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

दृष्टी फार तीक्ष्ण

ससाण्याची दृष्टी फार तीक्ष्ण असते. भरपूर उंचीवरुन त्याला छोटासा प्राणी अगदी सहज दिसतो.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

अनेक उपप्रजाती

ससाणा भारतासहीत अनेक देशांमध्ये आढळून येतो. याच्या अनेक उपप्रजातीही आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

नेमका वेग किती?

सासण्याचा उडण्याचा वेग किती असतो असा तुम्हाला प्रस्न पडला असेल तर हा पक्षी जास्तीत जास्त 350 किलोमीटर प्रती तास वेगाने उडू शकतो. हा वेग वंदे भारतच्या टॉप स्पीडपेक्षा दुप्पट आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

बुलेट ट्रेन एवढा वेग

म्हणजेच ससाण्याचा वेग हा एखाद्या विमान किंवा बुलेट ट्रेन एवढा असतो, असं म्हणता येईल.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

शिकार करणाऱ्या पक्षांचा राजा

ससाणा अनेकदा साप आणि छोट्या पक्षांचीही शिकार करतो. त्याच्या या कौशल्यामुळेच त्याला शिकार करणाऱ्या पक्षांचा राजा असं म्हटलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Mar 12, 2025

VIEW ALL

Read Next Story